पुस्तक परिचय प्रेडिक्टेबली इरॅशनल… (लेखक – डॅन अर्ले)
माणूस जगतो, म्हणजे काय? क्षणांपाठी क्षण, दिवसामागून दिवस आणि वर्षांनंतर वर्ष असा त्याचा प्रवास होणे म्हणजे जगणे असे सामान्यपणे मानले जाते. व्यावहारिक अर्थाने ते खरेही आहे. यासोबतच, माणूस जगतो म्हणजे क्षणोक्षणी तो निर्णयांची साखळी गुंफत जातो. ह्या क्षणानंतर तो असे जसे म्हटले जाते तसेच, ह्या निर्णयानंतर तो निर्णय, असे जगण्याचे स्वरूप असते. आपण ‘जगात’ जगतो …